शतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :
लेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.

-साहित्य संपादक

IMPS-mobile च्या माध्यमातून पैसे पाठविणे: जाणकारांकडून माहिती मिळावी:

Primary tabs

रविकिरण फडके's picture
रविकिरण फडके in काथ्याकूट
10 Feb 2019 - 7:34 pm
गाभा: 

मला माझ्या बँकेकडून खालीलप्रमाणे एक SMS आला:

Your A/C no. XXXXXX credited with INR 1.00 on 31-01-2019 by A/C linked to mobile no. XXXXXXnnnn (IMPS Ref. No. YYYYYYYYYY)

हा एक रुपया का, कसा, कोणी जमा केला हे मला माहीत नाही. (डिव्हिडंड इ. येतो तेव्हा SMS चा मजकूर वेगळा असतो. एक तर एक रुपया डिव्हिडंड कोठूनही अपेक्षित नाही, आणि तो आला तरी त्याचे स्वतंत्र इन्टिमेशन असतेच.)
दुसरी गोष्ट: हा जो मोबाइल क्रमांक दिला होता त्यातील शेवटचे चार अंक माझ्या मोबाइलचेच आहेत. ह्याला योगायोग म्हटले असते पण बरोबर एक आठवडा आधी माझ्या दुसऱ्या बँकेतील खात्यात, ज्यांना अगदीच किरकोळ म्हणता येणार नाही, अशा तीन रकमा जमा झाल्या होत्या!
हे सर्व प्रकरण दखल घेण्याजोगे होते आणि त्याप्रमाणे मी दोन्ही बँकांच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांनाही लेखी अर्ज दिले, आणि अन्य खबरदारीही (मोबाईल क्रमांक बदलणे, नवीन पासवर्ड, खाते काही दिवस गोठविणे, इ.) घेतली.
मी IMPS - मोबाइलच्या माध्यमातून कधी पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. बँकेला विचारणा केली असता कुणीही निश्चित अशी माहिती देऊ शकले नाहीत. फक्त मोबाइल क्रमांक माहीत असेल तर पैसे ट्रान्सफर करता येतात, मोबाईल क्रमांक आणि बँकेचा खाते क्रमांक माहीत हवा, मोबाइलला कोणत्यातरी UPI ला संलग्न हवा, मोबाइल क्रमांक आणि MMID नंबर माहीत हवा, अशी विविध उत्तरे मिळाली. मी कधी MMID नंबर जनरेट केलेला नाही किंवा माझ्याकडे कोणते UPI ही नाही.

तरी ह्या क्षेत्रातील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद!

प्रतिक्रिया

कुठूनही पैसे आले तरी त्याचा उगम शोधता येतोच.

बँक वाल्यांची/पोलिसांची तुम्हाला मदत करायची इच्छा दिसत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

11 Feb 2019 - 9:48 am | कानडाऊ योगेशु

कोणीतरी तुम्हाला बेनिफिशरी म्हणुन अ‍ॅड केले असावे त्याच्या बँक अकाऊंटमध्ये व टेस्ट करण्यासाठी १ रू चे ट्रान्जॅक्शन केले असावे.
तुम्ही तुमचे बँक डिटेल्स कोणाला दिले होते का?

नाही.. मी आत्ता आत्ता अश्या २ केसेस रिपोर्ट झालेल्या बघितल्या.
हे काहीतरी वेगळे आहे.

रविकिरण फडके's picture

13 Feb 2019 - 6:57 am | रविकिरण फडके

The answer is, No.

(My query, which perhaps was not clear, was specifically; what are the requirements for transferring the money by means of IMPS-Mobile? While I thank all the respondents, this query has not been answered.)

Typing in English as the MiPa transliteration feature on my laptop continues to be uncooperative.

इतक्यात किंवा पूर्वी कोणा कंपनी/ बँक इत्यादींना ऑटो डेबिट परमिशन (कर्ज हप्ता, वार्षिक प्रीमियम किंवा अन्य मासिक / नियतकालिक बिल खात्यातून दरवेळी ठराविक तारखेला आपोआप वळते करुन घेण्याची मुभा) दिली होती का?

त्यातले अनेकजण एक रु. IMPS टेस्ट क्रेडिट करुन व्हॅलीडेशन करतात.

अनुप ढेरे's picture

11 Feb 2019 - 12:48 pm | अनुप ढेरे

तुम्ही गुगल तेझ किंवा तत्स्म अ‍ॅपवर आहात का? किंवा नव्याने टाकलं आहे का असलं अ‍ॅप?
तुम्ही हे केल्यास तुमच्या काँटॅक्टमधल्या लोकांनी तुम्हाला हा १ रु पाठवल्याची शक्यता आहे.

योगेश कुळकर्णी's picture

12 Feb 2019 - 12:28 am | योगेश कुळकर्णी

केवळ याच कारणाकरता मी पेटीएम, आयएम्पीस, गुगल पे, भीम वगैरे कुठल्याच प्रकारचं मोबाईल बँकिंग अ‍ॅप वापरत नाही. त्यांच्या गेटवेज मध्ये इशूज आहेत आणि गेटवेत प्रॉब्लेम झाला तर दोन्ही पार्ट्या काखा दाखवतात.
तस्मात, प्रत्यक्ष पीसी उघडून वेब ब्राऊजर वरून नेट बँकिंग करूनच मी पैसे ट्रास्नफर किंवा बिलं भरणे करतो.

अगदीच अर्जंट असेल तर मोबाईल च्या वेब ब्राऊजर मध्ये प्रायव्हेट ब्राऊजिंग/ इनकॉगनीटो मोड इ वगैरे वापरून ट्रँन्झॅक्ट करतो. पीसीवरही काम झालं की ब्राउजर ची हिस्टरी, कॅश मेमरी इ डिलीट करून मगच काम संपवतो.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2019 - 10:08 am | प्रकाश घाटपांडे

आपल्याला कुठून पैसे आले हे समजलेच पाहिजे. नेट बँकिग मधे ते आले पाहिजे