'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती'

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
9 Feb 2019 - 11:07 am
गाभा: 

शब्दांची उत्पत्ती शोधणं हे नेहमीच रंजक असतं.मराठी भाषेतले किमान ६०% शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत अाहेत असं भाषातज्ज्ञ म्हणतात.याचा अर्थ किमान ६०% शब्दांचं मूळ हे संस्कृतमधे शोधता येईल.पण जे मराठी शब्द संस्कृतमधून आलेले नाहीत त्यांचं काय? त्या शब्दांची उत्पत्ती काय?कुठून आले असावेत हे शब्द?काय इतिहास असावा या शब्दांचा? प्राकृत,द्रविड? आंतरजालावर यासाठी फार साधने उपलब्ध नाहीत.शब्दकोश आहेत पण व्युत्पत्तीकोश मात्र नाहीत.
मिपावर भाषेसंबंधीचे जाणकार बरेच आहेत,विविध प्रकारचं मराठी वाचन असणारी मंडळी आहेत.ते या कामी मदत करु शकतील असे वाटल्याने हा धागाप्रपंच!

मला सध्या या शब्दांची उत्पत्ती हवी आहे.

सांग
ऐक
कुलूप
जेवण
झोप
डोळे
ससा
आंबट
गोड
तहान

अजून बरेच आहेत.सध्या एवढेच.
अजून कोणाला असेच संस्कृतबाह्य मराठी शब्दांच्या उत्पत्तीचे प्रश्न पडले असतील तर आवर्जून विचारा.होऊ द्या ज्ञानरंजन!

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

10 Feb 2019 - 5:00 am | रमेश आठवले

या शब्दांची उत्पत्ती या संस्कृत शब्दामधून असावी
जेवण = जीवन
ससा=शशांक
आंबट =आम्ल

पुष्कर's picture

10 Feb 2019 - 6:15 am | पुष्कर

संस्कृतात सश्याला शशक असे म्हणतात.

रमेश आठवले's picture

10 Feb 2019 - 7:32 am | रमेश आठवले

दुरुस्ती बद्दल धन्यवाद.

Blackcat's picture

10 Feb 2019 - 11:57 am | Blackcat (not verified)
Blackcat's picture

10 Feb 2019 - 11:59 am | Blackcat (not verified)

ससा

इथे लिंक आहे

पुष्कर's picture

11 Feb 2019 - 12:31 pm | पुष्कर

धन्यवाद

उपयोजक's picture

10 Feb 2019 - 9:56 am | उपयोजक

जेवण = जीवन??

मराठी, गुजराती हिंदी, वगैरे भाषा संस्कृतोदभव आहेत असे मानतात. गुजरातीत जेवण या साठी जीमण असा शब्द आहे तर हिंदीत जीमन असा शब्द आहे. हिंदीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमिताभ ने गायलेल्या ' खैके पान बनारसवाला ' या गाण्यात ' सोनेकी थालीने जीमना परोसा ' असे शब्द आहेत. या कडीवरून जेवण हा शब्द जीवन या संस्कृत शब्दावरुन आला असे मी समजतो.
परोसा म्हणजे वाढले.

गामा पैलवान's picture

10 Feb 2019 - 6:33 pm | गामा पैलवान

रमेश आठवले,

माहितीबद्दल धन्यवाद. ते अमिताबचं गाणं खैके पान नसून रंग बरसे आहे : https://www.google.co.uk/search?q=रंग+बरसे+लिरिक्स

आ.न.,
-गा.पै.

रमेश आठवले's picture

10 Feb 2019 - 7:57 pm | रमेश आठवले

धन्यवाद .

जेमन >> जेवण

दीपक११७७'s picture

10 Feb 2019 - 7:53 am | दीपक११७७

एखाद्या शब्दाचा शोध घ्याचा असेल तर खानदेशी, विदर्भिय, कोंकणी आणि पश्चिम महाराष्ट्र भाषेत त्याला समकक्ष काही शब्द आहेत का, ते पहावे, जेणे करुन शब्द उत्पत्तीचा अचुक अंदाज घेता येईलं.

मराठी भाषा ही एक स्वतंत्र भाषाही होतीच ना ? म्हणजे प्रत्येक शब्दाची इतर भाषेत उत्पत्ती सापडेलच असे नाही,

कुलूप शब्दाचा खोलणे क्रियापदाशी सम्बम्ध असेल का ? खोलप

प्रचेतस's picture

10 Feb 2019 - 11:37 am | प्रचेतस

कुलूप फारसी शब्द आहे.

गामा पैलवान's picture

10 Feb 2019 - 6:29 pm | गामा पैलवान

प्रचेतस,

मला कुलूप हा शब्द संस्कृतातल्या क्लृप धातूवरनं आलेला वाटतो. इंग्रजीतला clue ही त्यावरनंच आलेला वाटतो.

आ.न.,
-गा.पै.

पलाश's picture

10 Feb 2019 - 11:56 am | पलाश

गोड (गुड, गुडः हे गोड चवीच्या गुळाच्या समानार्थी संस्कृत शब्द आहेत.)

दीपक११७७'s picture

10 Feb 2019 - 3:21 pm | दीपक११७७

हे शब्द पण अपभ्रंश असतील तर?

तुषार काळभोर's picture

10 Feb 2019 - 7:23 pm | तुषार काळभोर

संस्कृत तसेच उत्तर भारतीय भाषा आणि भारताच्या पश्चिमेकडील देशांत आई साठी असलेले शब्द बहुतेक ने सुरू होणारे आहेत.
तर मराठीत ने सुरू होतो. ही व्युत्पत्ती मला दक्षिणेकडून आल्यासारखी वाटते. अम्मा, अव्वा इत्यादी.

दीपक११७७'s picture

10 Feb 2019 - 7:40 pm | दीपक११७७

ठेच इत्यादी लागल्यानंतर 'आई ग!' हा शब्द सहज निघतो, दक्षिणेतील लोकं सहसा 'अय्यो' असे उच्चारतात सोबत 'अम्मा' पण जोडतात. पण हे सगळं सहज होतं, कोणालाही शकवावे लागत नाही. लहानपणी पण असे शिकविल्याचे आठवतं नाही.

पुष्कर's picture

11 Feb 2019 - 12:36 pm | पुष्कर

लहान मूल आजूबाजूच्या लोकांच्या निरीक्षणातून देखिल बर्‍याच गोष्टी शिकते. त्यासाठी अगदी प्रत्येक गोष्ट पढवावीच लागते असे नाही. उदाहरणार्थ, आपापल्या भाषेतल्या शिव्या पण सर्वांना न शिकवता येतात आणि ते शब्द देखिल अगदी सहज निघतात. :)

दीपक११७७'s picture

11 Feb 2019 - 3:44 pm | दीपक११७७

आहो, शिव्या शिकणे आणि ठेच लागल्यावर 'आई' सहज निघणे यात खूप फरक आहे.

धन्यवाद

पुष्कर's picture

12 Feb 2019 - 2:23 am | पुष्कर

अगदीच मान्य आहे. सांगायचा उद्देश एवढाच होता की काही गोष्टी आपण निरीक्षणातून शिकतो.

समर्पक's picture

11 Feb 2019 - 11:19 pm | समर्पक

आई हा शब्द पुर्वेकडे आसामी कार्वी भाषेतही आहे. तसेच वायव्येकडे उझ्बेक भाषेतही आया शब्द आहे.

मराठीमध्ये भरपूर फारसी शब्द आहेत, उदाहरणार्थ ही द पासून सुरू होणारी यादी पहा.

दरोगा
दाणा
दाखल
दार
दरबान
दर्द
दरवाजा
दर्या
दस्त (आणि दस्तऐवज)
दस्तुर
दुश्मन
दुआ
दप्तर
दिल
दम
दुनिया
दवा
दुपार (दु-पेहेर)
दूर
दोस्त
दुकान
दौलत
दहा
दिवाण

(उदाहरण म्हणून थोडक्यात यादी दिली आहे, असे अनेक शब्द सापडतील)

माझा हा एक जुना लेख - यात बरीच आडनावे सापडतील
https://www.misalpav.com/node/42140

हा "द्वौ प्रहर" यावरून आला असावा.

हुप्प्या's picture

10 Feb 2019 - 11:27 pm | हुप्प्या

तहान : तहान ह्याला फारसीत तशन म्हणतात. संस्कृतमधे तृष्णा म्हणतात. ह्या दोन्हीपैकी एकापासून तहान हा शब्द बनला असावा. संस्कृत आणि फारसी ह्या भाषा बहिणी आहेत त्यामुळे त्यात अनेक शब्द सारखे आहेत.

झोप/झोपणे हा स्वपिती ह्या संस्कृत धातूपासून अपभ्रष्ट होऊन निर्माण झालेला शब्द असावा.

कुलुप हा शब्द फारसीमधे नाही. वर म्हटल्याप्रमाणे तो संस्कृतमधून आला असणे शक्य आहे.

आंबट हा आम्लपासून बनला असणार. ट हा प्रत्यय अनेक मराठी शब्दात आढळतो.

ऐक : ऐकणे हे क्रियापद कदाचित आकर्णयति ह्या संस्कृत धातूपासून बनला असेल. संस्कृतमधील श्रुणोति हा धातू सुनना ह्या हिंदी क्रियापदाचे मूळ आहे. मराठीचे मूळ हे वेगळ्या धातूतून आले आहे.

सांगणे: कदाचित संकथयति ह्या संस्कृत धातूपासून सांगणे हे क्रियापद बनले असेल. फारसी वा अन्य भाषात अन्य साम्य आढळले नाही.

गामा पैलवान's picture

11 Feb 2019 - 1:37 am | गामा पैलवान

हुप्प्या,

माहितीबद्दल धन्यवाद!

स्वप --> झोप वरून आठवलं की इंग्रजीत (की ल्याटिनात) हिप्नोटाईझ मधला हिप्न हा स्वप्न वरनं आलेला असणार.

Psychology मधला psyche हा इप्सित वरनं आलेला वाटतो.

आ.न.,
-गा.पै.

उपयोजक's picture

11 Feb 2019 - 10:04 am | उपयोजक

मराठी ही संस्कृतोद्भव भाषा असल्याचे किंवा संस्कृतसारख्या दर्जेदार भाषेशी तिचा संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी काही भाषातज्ञ प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध अोढूनताणून संस्कृतशी जोडतात.वि.श्री.खैरे यांनी त्यांच्या बर्‍याच पुस्तकांमधे हे लिहीलंय.

सांग याच्याशी मिळताजुळता शब्द तामिळमधे देखील आहे. सोल्लुंग சொல்லுங்க याचा अर्थ सांग असाच आहे.
संकथयति जवळचा की सोल्ल(मूळ धातू)/सोल्लूंग जवळचा ते तुम्हीच ठरवा.असे बरेच शब्द आहेत मराठीत ज्यांचा संबंध द्रविड/तामिळकडे लावता येईल.

हुप्प्या's picture

11 Feb 2019 - 10:57 am | हुप्प्या

काही शब्द नक्कीच तमिळ व अन्य द्रविड भाषांतून आले असतील. पण मराठी ही संस्कृतप्रमाणेच इंडो युरोपियन समूहातील भाषा आहे त्यामुळे त्या भाषेला संस्कृतमधून शब्द उचलणे जास्त सोपे जाते असे माझे मत आहे.

सोल्लूंग हेही सांगणे चे मूळ असणे अगदी शक्य आहे. माहितीबद्दल आभार. जर जुन्या मराठीत ह्या धातूचे आधीचे रुप सापडले तर त्या धातूचा उगम शोधणे सोपे जाईल नाहीतर आपापला अंदाज.

कदाचित अरबी असू शकतो...

अनिंद्य's picture

11 Feb 2019 - 11:49 am | अनिंद्य

उत्तम विषयावरचा धागा.

मला काही मराठी शब्दांचे मूळ काय कुठे असावे याबद्दल कुतूहल आहे.

डोळा (हा शब्द वर आला आहे)
जवळ / जवळीक
हळू / हळुवार
कोवळा
हळवा