छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

अमेरिकेतुन येणारे पार्सल कसे ट्रॅक करावे??

Primary tabs

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
11 Feb 2019 - 9:40 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स..

माझ्या एका मित्राने अमेरिकेतून पार्सल पाठवले आहे.
आज बरोबर एक महिना झाला तरी इथे पुण्यात ते पोहचले नाहीये.
ट्रॅकिंग site वर ट्रॅक केले असता 20 जानेवारी पासून एकच स्टेटस दिसतोय.

इन ट्रान्सीट
Your package is moving within the USPS network and is on track to be delivered to its final destination. It is currently in transit to the next facility.

अमेरिकेतून पार्सल पुण्यात पोहचायला अंदाजे किती दिवस लागतात?
Package भारतात पोहचले कि नाही हे कुठे ट्रॅक करता येईल? त्यावर मला काही टॅक्स भरावा लागेल का??
आणि समजा काही कारणास्तव ते माझ्या घरी आले पण मी नसेल तर नंतर मी ते स्वतः कुठून जाऊन घेऊन येऊ शकतो.?

मिपाकरांनी कधी USPS वापरून अमेरिकेतून
पुण्यात किंवा भारतात एखादी वस्तू पाठवलीये का कधी?? काय प्रोसेस आहे जरा मदत करू शकाल का?

धन्यवाद.. !!

प्रतिक्रिया

समर्पक's picture

11 Feb 2019 - 11:48 pm | समर्पक

कदाचित कस्टम मध्ये अडकले असेल. गेल्या वेळी एक पार्सल मुंबईऐवजी गोव्याला गेले आणि मग तिथून परत मुंबईत पाठवले गेले. मोठ्या शहरात साधारण ३-४ आठवड्यात व लहान शहरात त्याहून अधिक कालावधी लागतो.

अनन्त अवधुत's picture

12 Feb 2019 - 12:17 am | अनन्त अवधुत

मी फेडेक्स ने ३-४ वेळेस पार्सल पुणे आणि महाराष्ट्रात इतरत्र पाठवले आहे. पुणे -मुंबई मध्ये ८ दिवस तर इतरत्र १५ दिवस ते १ महिना हा माझा अनुभव.
तुमच्या पार्सलचे शेवटचे गाव कोणते ते बघा, इंटरनॅशनल ट्रान्सफर पॉईंट असेल तर समर्पक म्हणतात तसे कॅस्तं मध्ये असण्याची शक्यता जास्त.

अंतु बर्वा's picture

12 Feb 2019 - 5:19 am | अंतु बर्वा

Ips web tracking गूगल करून पहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

(अ) पार्सल कोठून-कोठे पाठवले आहे (उदा : विमानतळ, कस्टम्स ऑफिस, इ असलेले/नसलेले शहर),
(आ) पार्सलचा आकार व वजन किती मोठे आहे व
(इ) पार्सलमध्ये (विशेषतः कस्टमच्या दृष्टीने) कोणत्या वस्तू आहेत, यावरून लागणारा वेळ कमी जास्त होऊ शकतो.

कस्टमच्या दृष्टीने सरळ असलेल्या गोष्टींचे छोटे/मध्यम आकाराचे (१०-२० किलो) पार्सल अमेरिकेतील मोठ्या शहरातून भारतातल्या मोठ्या शहरात (उदा : न्यु यॉर्क शहर ते पुणे) ३ ते ७ दिवसांत पोहोचू शकते.

पार्सल ट्रेस करायला, पार्सलचा ट्रॅकिंग कोड/नंबर वापरून, कुरियर कंपनीच्या वेबसाईटवर बघा व तेथे दिसणारी माहिती घेऊन "Help --> Contact USPS" इथे तक्रार करा/चौकशी करा.

पार्सल अटलांटा जॉर्जिया येथून पाठ्वलेय.. USPS नॉर्मल डिलिव्हरी ने.
7-8 दिवस???
इथे महिना झाला.
ट्रॅकिंग site वर अजूनही शेवटचे लोकशन US मधलेच दाखवतेय.
आणि स्टेटस - In Transit.

हेल्प वर ई-मेल करून पाहतो काही अपडेट्स मिळतात का ते..
BTW पुण्यात पोहचल्यानंतर माझ्या घरापर्यंत आणून देण्याची जबाबदारी कोणाची?? भारतीय डाक का?? कि दुसऱ्या कोणत्याही कंपनी मार्फत येऊ शकते??
समजा मी घरी नसेल तर ते परत कोठे जाते??

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

कस्टमची समस्या नसल्यास पार्सल घरपोच येण्यास हरकत नाही. पण, असल्यास, बहुदा शेवटच्या कस्टम ऑफिसपर्यंत जावे लागेल, असे वाटते.

USPS वर भारतीय डाक ट्रॅकिंग नंबरही येतो. उलट दिशेनेही हीच प्रोसेस आहे, व त्यालाही महिना लागतो, (गेल्या वेळी ओरिसा मधुन मागवले होते तरी महिन्यात आले, व त्यातील बहुतांश वेळ कस्ट्म मध्येच गेलेला)

समजा मी घरी नसेल तर ते परत कोठे जाते?? - तुमच्या पिन कोड शी निगडीत पोस्टात परत जाते, पण सहसा तशी वेळ येत नाही, शेजार्‍यांकडे वगैरे ठेवतात, पण तुमच्या पोस्ट्मन ला विचारा...