[शशक' १९] - खजील

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Feb 2019 - 3:34 pm

हा नेहमीप्रमाणे दुकानात बसलेला दुपारची वेळ, साडी नेसलेली, हिडीस वाटावा असा मेकअप आणि टाळ्या वाजवत तो आला.
हा नेहमीप्रमाणे त्रासिक चेहऱ्याने काही नाही जा पुढे बोलला, तो क्षणभर रेंगाळला आणि मनाशी काहीतरी ठरवून खड्या आवाजात ह्याला बोलला अरे बाबा हिकड तर ये कि.
हा उठला त्रासिकपणे आणि त्याला गुर्मीत म्हणाला काय पाहिजे रे ?
त्याने काही लिपस्टिक, टिकल्या आणि चमकी वस्तू दाखवायला लावल्या आणि त्यातील भडक कलरच्या त्याला आवडलेल्या वस्तू हातात घेऊन याच्या हातात पैसे कोंबून फ़क़्त इतकेच बोलला “भाऊ कधीतरी आमची पण इज्जत कर”
आणि खजील झालेला हा ‘त्याच्याकडे’ पाहत हातात पैसे घेऊन सुन्नपणे उभा होता दुकानाच्या दारात.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Feb 2019 - 3:50 pm | यशोधरा

आवडली.

विनिता००२'s picture

6 Feb 2019 - 3:54 pm | विनिता००२

+१

श्वेता२४'s picture

6 Feb 2019 - 5:35 pm | श्वेता२४

खूपच छान विषय . पण अजून प्रभावी मांडता आलं असतं असं वाटलं.

Chandu's picture

6 Feb 2019 - 6:24 pm | Chandu

+1

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2019 - 6:25 pm | मराठी कथालेखक

माणशी

हे मनाशी हवं होतं का ?

बबन ताम्बे's picture

6 Feb 2019 - 6:27 pm | बबन ताम्बे

आवडली.

एमी's picture

6 Feb 2019 - 6:27 pm | एमी

+१
माणशी = मनाशी

पलाश's picture

6 Feb 2019 - 7:43 pm | पलाश

+१.

पद्मावति's picture

6 Feb 2019 - 8:58 pm | पद्मावति

+१

मित्रहो's picture

6 Feb 2019 - 9:07 pm | मित्रहो

+१

नावातकायआहे's picture

7 Feb 2019 - 2:51 pm | नावातकायआहे

नाही आवडली.....

विजुभाऊ's picture

7 Feb 2019 - 6:31 pm | विजुभाऊ

+१ आवडली

सुधीर कांदळकर's picture

7 Feb 2019 - 7:45 pm | सुधीर कांदळकर

आवडली. मेघना पेठे यांच्या एका कथेत एक विशेष प्रसंग आहे. एक मुलगी नटून प्रियकराला भेटायला जातांना पाऊस येतो. ती एका इमारतीच्या आडोशाला उभी राहाते. एक तृतीयपंथी बाजूला येऊन उभा राहतो. ती अंग चोरून तुच्छतेचाकटाक्ष टाकते. तेवढ्यात तिच्या केसात कावळ्याची विष्ठा पडते. तृतीयपंथी मायेने ती विष्ठा पावसाच्या पाण्याने हातानेच स्वच्छ करतो.

धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

8 Feb 2019 - 8:43 pm | चांदणे संदीप

+१
अगदी आजचाच प्रसंग. दुपारी हाटेलात बसलो होतो. दोन तृतियपंथी येऊ लागले. हाटेलवाला वैतागून ड्रॉवर उघडून सुट्टे पैसे काढू लागला आणि त्यांनी मात्र आत येऊन एक कोपऱ्यावरचा टेबल पटकावला. शांतपणे ऑर्डर दिली. जेवल्यानंतर बिल देऊन थाळी चांगली होती असं सांगून निघून गेले.

Sandy

ज्योति अळवणी's picture

10 Feb 2019 - 12:18 am | ज्योति अळवणी

अप्रतिम. आवडली

नाखु's picture

10 Feb 2019 - 10:33 am | नाखु

उत्तम कथा.
लोक माणूस म्हणून दारुड्या, गुन्हेगार लोकांना स्विकारतात मान्य करतात,पण या लोकांशी कायम तुच्छतेने पाहीले जाते हे फारच घृणास्पद कृत्य आहे.

उपेक्षित's picture

12 Feb 2019 - 12:26 pm | उपेक्षित

+१

विजुभाऊ's picture

12 Feb 2019 - 12:38 pm | विजुभाऊ

+१ असे न लिहिले नसेल तर तो प्रतिसाद स्पर्धेसाठी ग्रुहीत धरला जाईल का

उपेक्षित's picture

12 Feb 2019 - 6:15 pm | उपेक्षित

+१ असे लिहिले नसेल तर प्रतिसाद ग्राह्य धरला जाणार नाही असे जव्हेरगंज यांनी एका प्रतिसादात लिहिले असल्याचे आठवत आहे.

जव्हेरगंज's picture

12 Feb 2019 - 6:38 pm | जव्हेरगंज

+१ असे लिहिले नसेल तर प्रतिसाद ग्राह्य धरला जाणार नाही

बरोबर!

स्वधर्म's picture

12 Feb 2019 - 6:22 pm | स्वधर्म

+१

खंडेराव's picture

13 Feb 2019 - 6:05 pm | खंडेराव

+1

असंका's picture

14 Feb 2019 - 12:43 pm | असंका

+1

अमरप्रेम's picture

14 Feb 2019 - 5:01 pm | अमरप्रेम

+१

बोरु's picture

14 Feb 2019 - 8:02 pm | बोरु

+१

नँक्स's picture

16 Feb 2019 - 5:27 pm | नँक्स

+१

ईश्वरदास's picture

16 Feb 2019 - 9:25 pm | ईश्वरदास