.

चवणेश्वर अप्रतिम सौंदर्य

Primary tabs

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in भटकंती
18 Jan 2019 - 10:37 pm

चवणेश्वर ' सातारा शहरापासुन पुढे २८ मैल चवणेश्वराच्या पायथ्याशी निसर्गाची कृपा व वनश्रीने नटलेले कंरजखोप गाव आहे. गाव लहान आहे वस्ती बारासे ते तीन हजार पर्यंत आहे.ब्राह्मणाची घरे बोटावर मोजण्याइतकी आहेत.या गावातुन चवणेश्वराला रस्ता जातो.गावातील पाटिलकी धुमाळ यांच्याकडे आहे.तर जोशीपण(पुजारी) वाघ यांच्याकडे आहे.गावात बहुतअंशी धुमाळ आहेत इतर लोक थोडे.गावात यायला कच्ची पायवाट आहे.S.T स्टॅन्ड समोर जुनी देवीची विहीर अाहे म्हणे ! किती दुष्काळ पडला तरी त्या विहीरीचे पाणी आटत नाही.दुष्काळात बिचारी एकटी सार्‍या गावाला पाणी पुरवते तरी पाण्याने भरलेली असते.या गावात दोन प्राचीन व संपुर्ण दगडी शिल्पकृती ने नटलेली दोन मंदिरे आहेत.व इतर अन्य देवळे ही आहेत.श्री रामदासांनी स्थापना केलेला मारुती चे मंदिर गावात प्रवेश करताना सुरुवातीस लागते.श्री.जानुबाई ही गावाची ग्रामदेवता असुन दगडाने बांधलेल्या व शिल्पकृतीने नटलेल्या छोट्याश्या मंदिरात भक्तांसाठी अहोरात्र उभी आहे.देवीची मुर्ती विशाल असुन संगमरवरी दगडाची आहे.देवळासमोर भव्य दगडी दिपमाळ आहे.देवीच्या नवरात्रीत रात्र दिवस दिपमाळ तेवत असते.आधी वाजत घाजत देवळात नवरात्र बसते.दुसरा मान पाटलाचा.तिसरा मान गावात जोशीपण करणार्‍या ब्राह्मणाचा मग नंतर गावातील सर्व घरात नवरात्र बसवले जाते.कोणी एका बाजुला बसलेल्या बाईने देवळात जाऊन दर्शन घेतले म्हणुन पुर्वीच्या देवीची मुर्ती भंग पावली ती मुर्ती गावच्या विहीरीत विसर्जन करुन त्या जागी नवीन( आताची) मुर्ती बसवली.या देवळात बाजुल्या बसलेल्या बायका सोयर सुतक असलेली माणसे देवळात जात नाहीत.अनेक हात असलेली उभी हसरी देवीची मुर्ती आहे.भक्तजनांचे लक्ष वेधुन घेते.देवीला पायापासुन डोक्यापर्यंत हातात सर्व अयुधे चांदीसोन्याची आहेत.ही देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी भावना आहे.काही जणांना त्यांची प्रचीती येते.या देवळाच्या पुढे चवणेश्वराचे देऊळ आहे.गावातील कोणत्या तरी भक्ता भेटण्यासाठी डोंगरावरील चवेश्वर (शंकराचे रुप ) गावात आला असावा असे सांगितले जाते.शिवाय गावात विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.संपुर्ण दगडाचे प्राचीन शिल्पकृत्तीने नटलेले असे शंकराचे मंदिर आहे.ह्या देवळाविषयी असे सांगितले जाते की पुर्वी हे गाव जंगलमय होते.प्रामुख्याने कंरजी ची झाडे फार होती.अजुनही आहेत.जवळच्या एका गावात एक गरीब धनगर राहात होता.सकाळी उठावे सर्व कामे आटपुन देवाचे नाव घेत झाडे तोडायला जावे.झाडे तोडुन आसपासच्या गावात नेऊन विकावी.मिळेल त्या पैशावर गुजराण करावी.दिवसामागुन दिवस चालले होते.धनगर खांद्यावर कुर्‍हाड व पंचा जगंलात चालला होता.तो जंगलात पोहचला.एक मोठे कंरजाचे झाड हेरले.व झाडावरती कुर्‍हाड मारली ती झाडाच्या खोडाशी बसली.व झाडातुन रक्ताच्या चिंकाड्या बाहेर पडल्या.धनगर घाबरुन गेला.ह्या रक्ताच्या चिळकड्या झाडातुन कश्या व का हे त्याला कळले नाही.घाबरलेला धनगर पळत आला व त्याने गावकर्‍याना ही गोष्ट सांगितली.व तेही घाबरुन गेले.तसेच आश्चर्य वाटले.ते जंगलात आले.त्यांनी मोठ्या पर्यत्नाने झाड पाडले.तो काय आश्चर्य झाडाखाली भव्य दगडी शंकराची पिंड होती.धनगराने मारलेला कुर्‍हाडीचा घाव त्या पिंडीवर बसला व त्यातुन रक्ताची धार लागली म्हणुन सर्वांनी शंकराची क्षमा मागितली.व ह्या पिंडीवर गावकर्‍यांनी दगडी कलाकुसरयुक्त मंदिर बांधले.या मंदिरात एकात एक असे तीन सभामंडप आहेत.शेवटच्या सभामंडपात शंकराची पिंड आहे तिच्या मागे पार्वतीची दगडी मुर्ती आहे.देवळासमोर शंकराचे वाहन नंदी ( दोन मुर्ती ) आहेत.नंदिवर अलंकार कोरलेले आहेत.नंदिचे पावसापासुन संरक्षण घेण्यासाठी डोक्यावर दगडी छत आहे.त्याला नक्षीदार चार खांब आहे.अजुनही नागराजाच्या स्वरुपात शंकर गावात वास करीत आहेत अशी भक्तजनांची समजुत आहे.देवळावर दगडी कळश आहे.देवळासमोर मैदानात सहा फुट उंचीची दगडी दिपमाळ आहे.त्रिपुरीपौर्णिमेला रात्र व दिवस दिवा जळत असतो.गावात जोशीपण करणार्‍या ब्राह्मणाचा दिवा पेटवण्याचा मान आहे.ती प्रथा आजपण चालु आहे.असे हे शंकराचे मंदिर फारसे माहीत नाही. याच करंजखोप गावाच्या मागे चवणेश्वराचा डोंगर आहे, या ठिकाणी ऋषी चवण यांनी तपश्चर्या केली. याच डोंगरावर असलेल्या आवळ्याच्या झाडापासून चवण ऋषींनी च्यवनप्राशा तयार केला असे मानले जाते. या ठिकाणी चवणेश्वराचे मुळ् स्थान आहे, सध्या वाहन जाईल असा रस्ता तयार केलेला आहे. वर्षातून एकदा इथे यात्रा भरते. शेतीतही या गावाने प्रगती केली आहे.अशा या तिर्थक्षेत्राला आवर्जुन भेट द्या. जाल कसे.पुणे ते सातारा बसने.व तेथुन करंजखोप जावे.जवळसे रेल्वे स्टेशन वाठार तेथुन पुढे करंजखोप जाता येथे.लेखक.मुकुंद

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

19 Jan 2019 - 11:46 am | प्रमोद देर्देकर

खूप छान माहिती .
मिपावर स्वागत. पहिल्या लेखापेक्षा हा व्याकरण दृष्ट्या जरा बरा आहे .
महिती देताना पूर्ण द्या. वर्णन करताना घाई गडबड नको . लिहून झाल्यावर पुर्व परीक्षण करा. तशी सोय आहे.
तसेच प्रवास वर्णन लेखात जरा छायाचित्र टाकत जा म्हणजे वर्णन आणखी खूलेल.

तसेच प्रत्येक लेखा खाली स्वाक्षरी नको , लोकांना माहित आहे की तो तुमचाच लेख आहे ते.
पु. भा. प्र.

दुर्गविहारी's picture

19 Jan 2019 - 1:31 pm | दुर्गविहारी

चांगला प्रयत्न! मुख्य म्हणजे इथे झालेली टिका सकारात्मक घेउन तुम्ही सुधारणा केलीत हे महत्वाचे. मात्र भटकंतीवर धागा लिहीताना सविस्तर वर्णन, फोटोंची जोड, तिथले स्थानिक संपर्क क्रमांक आणि शक्य झाल्यास नकाशा हे टाकले तर नंतर जाण्यार्‍यांना सोयीचे होते. मि.पा.वरचे आधीचे धागे उघडून पाहिल्यास तुम्हाला धागा कसा लिहीला पाहिजे हे लक्षात येईल. असो>
या धाग्याविषयी. चवणेश्वर या ठिकाणाविषयी गावकार्‍यांना अधिक माहिती विचारली असती तर काही कथा, प्रवास एकायला मिळाले असते जे धाग्याला अधिक रोचक करतात. याच करंजखोप गावाच्या मागे चवणेश्वराचा डोंगर आहे, या ठिकाणी ऋषी चवण यांनी तपश्चर्या केली. याच डोंगरावर असलेल्या आवळ्याच्या झाडापासून चवण ऋषींनी च्यवनप्राशा तयार केला असे मानले जाते. या ठिकाणी चवणेश्वराचे मुळ् स्थान आहे, सध्या वाहन जाईल असा रस्ता तयार केलेला आहे. वर्षातून एकदा इथे यात्रा भरते. अर्थात मी अजून इथे गेलेलो नसल्याने अधिक काही लिहू शकत नाही.
बाकी आपल्या पुढील लिखाणाला शुभेच्छा.

ज्योति अळवणी's picture

29 Jan 2019 - 6:15 am | ज्योति अळवणी

ठळक बातम्या अशा प्रकारे आपण लेख लिहिला आहात. माहिती उत्तम आहे. पण तुम्ही जे ठिकाण बघितलेत ते इतरांनी देखिल आवर्जून बघावे असे वाटत असेल तर थोडं ओघवत लिहिलंत तर बरं होईल. एखादा गमतीशीर अनुभव किंवा दर्शन घेताना तुमच्या मनात आलेले विचार किंवा दुर्ग विहारी यांनी म्हंटल्याप्रमाणे काही फोटो अशी माहिती दिलीत तर वाचकाला ते ठिकाण बघण्यासाठी जाण्याची उत्सुकता वाढते.

अर्थात हा लेख माहितीपूर्ण आहे यात वादच नाही. पुढील लेखनास शुभेच्छा