छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

असा काही नियम आहे का?

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
26 Jan 2019 - 3:38 pm
गाभा: 

एका भाषाविषयक व्हॉटसअॅप समुहातील चर्चेवर हा धागा आहे.

WhatsApp,Facebook,YouTube किंवा अशाच काही अॅप्सची,सॉफ्टवेअर्सची नावे ही विशेषनामे आहेत.ही नावे स्वामित्वहक्क संस्थांकडे रजिस्टर केलेली आहेत.ही नावे मराठीत जशीच्या तशी वापरायला तशी समस्या काहीच नाही.पण यांच्या मराठीकरणामुळे किंवा एकूणच कोणत्याही भारतीय भाषिकांनी त्यांच्या भाषेत भाषांतर करणे हे नियमबाह्य आहे का? किंवा तो गुन्हा वगैरे काही आहे का? असल्यास शिक्षा किंवा दंड काय आहे?

WhatsApp = कायप्पा
YouTube = तू नळी
Twitter = चिवचिव
Facebook = चेहरापुस्तक/चेपु

असे भाषांतर करणे अयोग्य आहे का? असल्यास कारण काय?

एका तमिळ मित्राने सांगितले की तमिळनाडूत नोंदणीकृत संस्था अशा अॅप्स,सॉफ्टवेअरची तमिळ नावे जाहीर करतात.किती तमिळ लोक ती वापरतात हा शोधाचा विषय असला तरी त्यांचा भाषिक आग्रह पाहता आवर्जून वापरण्याकडे कल असण्याची शक्यता आहे.उदाहरणार्थ हे शब्द पहा.

1. WhatsApp - புலனம்

2. youtube - வலையொளி

3. Instagram - படவரி

4. WeChat - அளாவி

5.Messanger - பற்றியம்

6.Twitter - கீச்சகம்

7.Telegram - தொலைவரி

8. skype - காயலை

9.Bluetooth - ஊடலை

10.WiFi - அருகலை

Kaasu पासून Cash
Navi पासून Navigate
Kattumaram पासून Catamaran
Kayaru पासून Coir

असे बरेच शब्द आहेत जे मूळ भारतीय शब्दांपासून बनलेले आहेत.ही रजिस्टर्ड नावे नसली तरीही इंग्रजी शब्दकोश बनवणार्‍या संस्था जर भारतीय शब्दांचं आंग्लिकरण करत असतील तर भारतीयांनी इंग्लिश शब्दांचं भारतीयीकरण केलं तर बिघडलं कुठे?कारण वरील अॅप्सची नावे ही इंग्लिश शब्द गुंफून बनवलेली नावे आहेत.

याबाबत खात्रीशीर माहिती/मार्गदर्शन हवे आहे.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Jan 2019 - 3:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कशासाठी हा भाषेचा अट्टाहास? "माझी मातृभाषा लय भारी' असे तामिळ लोकांना नेहमीच वाटते हे खरे.

उपयोजक's picture

26 Jan 2019 - 6:14 pm | उपयोजक

त्याच अट्टहासामुळेच आज भाषा टिकवून ठेवण्याबाबत ते जगात आदर्श ठरलेत.महाराष्ट्रातल्या भैय्यांसोबत हिंदीत बोलायला जाणार्‍या मराठी माणसांनी तर हे आवर्जून पहावं. मिपाप्रमुखांनी करुणानिधी गेल्यावर काढलेला धागा वाचलात ना?

यशोधरा's picture

26 Jan 2019 - 5:26 pm | यशोधरा

तमिळ नावे काय आहेत ते देवनागरीत लिहा की. ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले सगळ्यांना कळेलच असे नाही.

उपयोजक's picture

26 Jan 2019 - 6:18 pm | उपयोजक

1. WhatsApp - புலனம் पुलनम्

2. youtube - வலையொளி वलैयोळी

3. Instagram - படவரி पटवरी

4. WeChat - அளாவி अळावी

5.Messanger - பற்றியம் पट्रीयम्

6.Twitter - கீச்சகம் कीच्चकम्

7.Telegram - தொலைவரி तोलैवरी

8. skype - காயலை कायलै

9.Bluetooth - ஊடலை उडलै

10.WiFi - அருகலை अरुकलै

यशोधरा's picture

26 Jan 2019 - 6:44 pm | यशोधरा

मस्त! धन्यवाद!
तुम्हाला ब्राह्मी लिपी, तमिळ लिहिता वाचता येते का?
येत असल्यास एक लेखमालिका होऊन जाऊ देत की. तमिळ शिकवा इथे, अगदी लिपीपासून सुरुवात करा.

तमिळ अ, आ, इ..

शाम भागवत's picture

26 Jan 2019 - 7:00 pm | शाम भागवत

हेच म्हणतो.

उपयोजक's picture

26 Jan 2019 - 11:25 pm | उपयोजक

हो तमिळ व्यवस्थित वाचता येते.थोडी लिहिताही येते.मला येते तितकी नक्की शिकवेन.

यशोधरा's picture

26 Jan 2019 - 6:46 pm | यशोधरा

अजून एक राहिले. ह्या तमिळ संज्ञांचे मराठी भाषांतर कराल का?

इप्पडिया? इ रोम्ब नल्लारिक्या.
निंगळ सरी सोलगिरान!

उपयोजक's picture

26 Jan 2019 - 11:29 pm | उपयोजक

आण्णा! नी नन्राह तमिळ् पेसुगिरिर्गळ् :)

पैलवान's picture

27 Jan 2019 - 6:36 am | पैलवान

एन्ना सोलरिंगा?
तमिळ तेरिया!!

वणक्कम् ओ अण्णा(ज्)

जल्ला काय बी कल्ला नाय !

बाकी रतीलाल अग्निहोत्री आणि कमला हसन च्या सिनेमामुळे फक्त अप्पडिया तेव्हढे माहीत होते.

पुढे एका मद्र देशीय मैत्रिणी कडून तामिळ भाषा शिकायच्या मिषाने नान उन्ने कादिली केरेन असे काहीसे वदवून घेतले होते व उच्चार व्यवस्थित आणि नीट जमावेत म्हणून तिच्या समोर या वाक्याची अनेक वेळा उजळणी केली होती पण... असो.

कंजूस's picture

27 Jan 2019 - 6:02 am | कंजूस

नन्री. रॅपिडेक्स पुत्तक पडाक्किरा.
-
रॅपिडेक्स हिंदी - तमिल , तसेच इतर भाषेंच्या पुस्तकातून थोडेफार शब्द कळतात.

मारवा's picture

27 Jan 2019 - 8:10 am | मारवा

भाषेचा अट्टाहास का या प्रश्नाला धागालेखक बाणेदार उत्तर देतात की

त्याच अट्टहासामुळेच आज भाषा टिकवून ठेवण्याबाबत ते जगात आदर्श ठरलेत.महाराष्ट्रातल्या भैय्यांसोबत हिंदीत बोलायला जाणार्‍या मराठी माणसांनी तर हे आवर्जून पहावं.

आणि खाली लगेच दुसरी एक मराठी व्यक्ती तामिळ मध्ये सुरु होताच बाणेदार पुरुष साक्षात मराठी संस्थळावर तामिळ टंकायला लागतात. शिवाय हे ही कळत की ते आवर्जुन रॅपिडेक्स वगैरे वापरुन तामिळ शिकताहेत शिवाय एके ठिकाणी बाणेदार पुरुष शिकवायलाही तयार होतात

कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?

किच्चकम पेक्षा चिवचिव फार आवडण्यात आलेले आहे.

संस्थळावर ज्यादीवशी किचकट तामिळ चा किचक वध होउन किच्चकम थांबेल व मराठीची मधुर चिवचिव सुरु होइल तोच खरा सुदिन तोच खरा एक मे

यशोधरा's picture

27 Jan 2019 - 9:15 am | यशोधरा

का हो मारवा साहेब, ज्या भाषेवर आपलं निरतिशय प्रेम आहे, ती भाषा अशुद्ध लिहिलेली चालते का? की भाषाप्रेमामध्ये शुद्धलेखन, व्याकरण इत्यादि फारसे महत्त्वाचे नाही?

मराठी व्यतिरिक्त दुसरी भारतीय भाषा शिकणं म्हणजे मराठीचा द्वेष?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2019 - 11:03 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अग, तो मारवा त्यांच्या लिहिण्यातले contradiction का काय म्हणतात ते दाखवून देत होता. म्हणजे "अट्टाहास का"? ह्यावर उत्तर "ते तामिळ लोक पहा" म्हणजे ते कसे दुसर्या कोणत्याही भाषेला महत्व देत नाहीत.. आणी लगेच खाली कोणीतरी तामिळ टंकायलाही चालू करतो.काही जण "शिकुया" म्हणून रस दाखवतात.
मराठी माणसाने अनेक भाषा शिकाव्यात असे माझेही मत आहे.

अहो माई, पण त्यामुळे त्यांचे सुरुवातीस नोकरीच्या जागी खूप नुकसान झाले आहे कारण तामिळशिवाय इतर कोणत्याही भाषेत संवाद साधता येत नसे. हे मी स्वतः बंगळुरास पाहिले आहे गो माई! खूप चाचपडत तामिळी इतर भाषेंत संवाद साधण्यास. आता परिस्थिती बदलली आहे, असे वाटते.

पण काय गो माई, हे मारवाजी जर ऑफिसात वगैरे जात असतील, तर कार्यालयीन कामकाजात मराठी वापरत असतील का गो? नसतील वापरत तर कसे गो होईल मराठीच्या अभिमानाचे? आता काय करावयाचे माई?

हो! बदलत आहे.मी आणि माझे काही मित्र आम्ही तमिळांना हिंदी,मराठी शिकवतो एका ग्रुपात! ते सुद्धा आवडीने शिकतात.तमिळनाडूच्या शाळांमधे हिंदी शिकवली जात नाही.त्रिभाषासूत्री नाहीये तिथे.हिंदी सिनेमे केवळ चेैन्नै,मदुरै,कोईंबतूर अशा मोठ्या शहरांत लागतात. शिवाय संस्कृत शब्द वापरु नका असा प्रचार अजूनही द्रविड चळवळ करत असते. टिव्हीवरच्या बातम्यांमधेही शुद्ध तमिळ शब्द वापरण्यावर कटाक्ष असतो.यामुळे संस्कृत शब्दांचा कमीतकमी संपर्क येतो. पणअसं असूनही सोशल मिडियाच्या माध्यमातून जमेल तशी हिंदी शिकू पाहतात.
तमिळ वर्णमालेत हिंदीइतकी व्यंजने नाहीत. शिवाय मानव आणि देव सोडले तर बाकीचे सगळे तमिळ भाषेत नपुंसकलिंगी त्यामुळे त्यांचा घोळ होतो.पण तरीही धडपड सुरु असते.
सध्याची तमिळ तरुण पिढी मात्र तमिळप्रेमाने तितकी भारावलेली नाही.तिथले राजकीय नेतेमंडळी तमिळप्रेमाचा यज्ञ धगधगता ठेवत असतात. बाकी राजकारणामुळे कोणाचं भलं झालंय असं आपण म्हणतो पण तमिळनाडूत मात्र राजकारणी लोकांमुळे तमिळ भाषेचं बरंच भलं झालंय. :)

यशोधरा's picture

27 Jan 2019 - 12:04 pm | यशोधरा

माझा एक तमिळ सहकारी होता, अतिशय कडवा तमिळ भाषिक. हिंदी त्याला व्यवस्थित समजत असे पण बोलत नसे. मात्र हिंदी चित्रपटातील गाणी मात्र भरपूर ऐके. हे कसे काय, असे विचारून आम्ही त्याची खूप खेचत असू आणि तोही हसत असे! त्याचाही जाज्वल्य अभिमान होता, काय करायचे!
=))

उपयोजक's picture

27 Jan 2019 - 12:05 pm | उपयोजक

कायतरी भलताच समज करुन घेतलात तुम्ही! मी अट्टहास म्हणालो ते आपल्या राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त येणार्‍या लोकांशी त्या त्या राज्यातल्या स्थानिक भाषेतून बोलणं याला.त्यात चूक काहीच नाही.याबाबत अट्टहासच हवा. शिवाय ज्यांच्याशी तमिळमधून बोललो ते मराठी भाषिकच आहेत.परप्रांतीय नव्हे!

नाखु's picture

27 Jan 2019 - 1:06 pm | नाखु

आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे यालाच माज असणे समजणारे माज आणि अभिमान यात ठरवूनच गल्लत, सरमिसळ करतात.
मराठी मातृभाषा असल्याचा माज नक्कीच नकोय पण लाज वाटते असं बुळचट धोरण तर नक्कीच नकोय.

चार मराठी माणसाचे संभाषण ऐका मुंबईत आणि पुण्यातील आय टी कंपन्यांमध्ये.सगळे अस्सल महाराष्ट्रीयन मराठमोळ्या घरातील असूनही हिंदी इंग्रजीच्या चिंध्या चिंध्या बांधून पताका खांद्यावर घेताना दिसतात.

शक्य तिथे मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा नाखु वाचकांची पत्रेवाला नाखु

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2019 - 1:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चार मराठी माणसाचे संभाषण ऐका मुंबईत आणि पुण्यातील आय टी कंपन्यांमध्ये

भारतात मोठ्या शहरांमध्ये साधारण अशीच अवस्था असावी असे आमचे मत. मराठी मॅनेजर मराठी प्रोग्रॅमरला "संगणक आज्ञावली लिहुन झाली का ? असल्यास गुणवत्त्ता अभियंत्याकडे तपासायला देऊया" असे म्हणण्याची शक्यता कमी. कोर्टाचे निकाल इंग्रजीत्,जाहिराती इंग्रजीत्,बॉलिवूडी/मराठी अभिनेते सगळे इंग्रजाळलेल्या हिंदी किंवा मराठीत. हे असे असताना यु-ट्युबला तुनळी, फेसबूकास -चेपु म्हणायचे.. कशासाठी?

अशीच अवस्था असावी असे आमचे मत

तुमच्या ह्यांचे मत असते ना नेहमी? की माईचे हे, माईचे जालीय नाव व रूप घेऊन लिहित आहेत? की आमचे म्हणजे तुझे आणि तुझ्या ह्यांचे? =))

उपयोजक's picture

27 Jan 2019 - 3:27 pm | उपयोजक

>

म्हणूनच करायचं.दोन्ही पारडी समान करायला किंबहूना पुढे जाऊन मराठीचं पारडं जड करण्यासाठी म्हणून करायचं. आपल्याच मातृभाषेचं नुकसान होतंय,तिच्यात भरमसाठ इंग्लिश शब्द शिरतायत म्हणून करायचं.

नाखु's picture

27 Jan 2019 - 10:54 pm | नाखु

वस्तुस्थिती चा विपर्यास करून विषय पूर्वनियोजित लक्ष्याकडे पोहचवणे हाच ह्यांच्या इकडच्या स्वारींच ध्येय आहे.
मी मराठी असूनही कामाबाहेरच्या, सार्वजनिक ठिकाणी शक्य होईल तिथे दाक्षिणात्य लोक एकमेकांशी आवर्जून मातृभाषेतून संवाद साधतात तसं मराठी माणसाने करावं इतकं सुस्पष्ट टंकले आहे.
पण वडाची साल पिंपळाला.

अट्टाहास आणि आपसूक यातला नेमका फरक समजला आहे असा घाटी मराठी वाचकांची पत्रेवाला नाखु

मी जिथे पर्यटनास जातो तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. शंभरेक उपयुक्त शब्द माहीत झाले की तिकडे आजुबाजूस कोणत्या गोष्टीबद्दल चर्चा चालू आहे ते कळते. शिवाय तिकडच्याच सिटी बसमधूनच फिरतो तेव्हाही खूप उपयोग होतो. एकदोन किस्से सांगता येतील.

बाकी तमिळनाडमध्ये "कोंजम कोंजम पेसुगिरेन" म्हणणे हिंदी,इंग्रजी झाडण्यापेक्शा नक्कीच चांगले.
मला इकडच्या भाषिक वादात पडायचे नाही.

बाकी तमिळ लोक हिंदी गुपचूप शिकतात कारण सरकारी नोकरी मिळण्यासाठी उपयोगी म्हणून. तमिळ पेप्रांत हिंदीचे धडे मी '६५ -'७० साली पाहिले आहेत.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2019 - 3:43 pm | नितिन थत्ते

ते हैयो हैय्यैयो कुठे आहेत?