जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Re-Revisited)

Primary tabs

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
11 Jan 2019 - 2:20 pm

साडे तीन शहाणे आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited) हे दोन्ही धागे वाचलेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय असू शकतील याचं हे विवेचन आहे असं जाणवलं. पण एक विचार आला की प्रॅक्टिकल नेहमी उलट किंवा वाईटच का असावं? दु:खदायकच का? त्यातून तयार झालेला हा संवाद.

सिनेमा संपतो. जगणं नाही. काही संवाद [मराठीतून] -

.
.
.
इमरानः काय रे मोरोक्को काय म्हणतंय?

लैला: काय मोरोक्को घेऊन बसलाहेस अजून. आम्हीही कामं धामं करतो म्हटलं.. :-)

इमरानः ओह.. लैला.. मस्त वाटलं आवाज ऐकून! अर्जुन कुठं आहे?

लैला: तो कामावर जाताना फोन घेऊनच जात नाही आजकाल. म्हणतोय पुन्हा लेकाचे एखादी ट्रीप प्लॅन करतील.. यावेळेस तर जॉब नक्की जाईल माझा!

इमरानः अरे? मला वाटलं हा सुधरला.. परत ये रे माझ्या मागल्या का काय? तसं असेल तर सरळ उडून ये इकडे भारतात माझ्याकडे.. यू नो राईट.. मला अजूनही मजनू म्हणतात!

लैला: नाही रे.. तो ठीक आहे. कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे म्हणजे काम सोडून देणे नव्हे. हा सरळ सगळं सोडूनच येणार होता. समजावलं मी त्याला.

इमरानः आणि त्यानं ऐकलं?

लैला: मी सुद्धा फॅशन इंडस्ट्रीत आहेच की. काम महत्त्वाचं आहेच पण सोबत बाकी अनेक गोष्टींनाही महत्त्व द्यायला हवं, जीवनाचा आस्वाद
घ्यायला हवा एवढंच माझं म्हणणं.

इमरानः स्सह्ही है बॉस.. पण यामुळे एक गोची झाली ना...

लैला: काय?

इमरानः माझा चान्स हुकला त्याचं काय?

लैला: नूरीयाचा कॉन्टॅक्ट आहे ना अजून? का तिलाही विसरलास? तू अशक्य आहेस रे..

इमरानः आहे की.. पण मी फायनान्शीयल ब्रोकर नाही ना की सतत जाऊ शकेन परदेशात तिला भेटायला..

लैला: अरे हलकट माणसा.. भेटायलाच हवं काय रे? आधी स्पॅनिश शिकून घे ना त्यापेक्षा.. फोनवर बोलत जा मग.

इमरानः पहा पहा.. कोण सांगतंय ते.. पहिल्यांदा भेटलो तिला तेव्हा काय बोललेलीस.. आठव? म्हणे प्रेमाला भाषा लागत नाही. छ्या.. खर्‍याची दुनियाच नाही राव..

लैला: प्रेमाला भाषा लागत नाहीच. पण दुसरं माध्यम काय आहे सध्या तुझ्याकडे गाढवा..?

इमरानः [आयला मारतीये ही..] ओय.. हळू.. बास... मी शिकतोss..

लैला: आत्ता कसं? बाय द वे, परवा कबीरसोबत बोलणं झालं. नवीन प्रोजेक्टवर काम चालू केलंय म्हणे.

इमरानः हो, माझंही झालं होतं बोलणं.. चांगलं चाललंय म्हणे.

लैला: तुझं काय चाललंय सध्या?

इमरानः सध्यातरी जुनाच जॉब. नवीन काही कल्पना आहेत डोक्यात. बघुयात. तुला सांगेनच, यावेळेपासून मदत घेणार तुझी.

लैला: ओह वॉव.. न्यू वर्क टाईप.. बट इट्स वर्थ अ ट्राय!

इमरानः येस... तुम भी आओ, नूरीया को भी लाओ.. मज्जानु लाईफ..

लैला: आहा रे.. म्हणे नूरीयाला घेऊन ये..

इमरानः वो अपुन का पेशल पार्ट ऑफ लाईफ हय.

लैला: असे पार्ट मोजायचे ठरवलेत ना तुझ्या आयुष्यातले तर..

इमरानः [मधेच तोडून..] अरे थांब की जरा.. चावी लागल्यासारखी सुरु होते. अगं मी ऐकलं कबीर नताशासोबतच काम करतोय.. चांगलंय यार.
ब्रेक-अप झालं तरी कामाच्या आड येऊं देत नाहीत ते.

लैला: नाही तसं नाही.. मी बोलले होते मागे नताशासोबत. शेवटी गैरसमज का होईना, माझ्यामुळे खडा पडला होता तर त्याची थोडी का होईना जबाबदारी येतेच ना माझ्याकडे. लग्नाला आली तेव्हा सगळ्यांशी चांगली मैत्री झालेली तिची.. गोड पोरगी आहे. बट शी नीडेड टू गिव्ह टाईम, फॉर द रिलेशनशिप टू ब्लॉसम..

इमरानः लैला, तू फॅशन इंडस्ट्री सोबत, लाईफ अ‍ॅण्ड रिलेशनशिप कंसल्टंट म्हणूनसुद्धा काम का नाही सुरू करत. तशीही सगळ्यांना सल्ले देत फिरत असतेस..

लैला: अरे जर आपल्या बोलण्याचा समोरच्याला थोडासासुद्धा उपयोग होत असेल, तर काय हरकत आहे? मी काही मानगुटीवर बसत नाही की.. माझा सल्ला ऐका म्हणून..

इमरानः शि.सा.न. .. माते, मला काय सल्ला आहे आपला?

लैला: वत्सा, तुला सल्ल्याची गरज नाही. तू मनमौजी आहेस. सोबत हलकटसुद्धा आहेस. त्यामुळे तुला सल्ला देऊन जगाला आणिक त्रास होईल असं मी काsssही करणार नाहीये.
.
.

राघव

मौजमजाचित्रपटप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

11 Jan 2019 - 3:26 pm | मनिम्याऊ

सहीच

उपयोजक's picture

12 Jan 2019 - 3:04 pm | उपयोजक

फक्कड!!!

छान लिहिलंय राघवदादा...ही पण एक शक्यता आहे हे मान्य..

पण आपल्या लिखाणात जे सिनेमात सांगितलंय त्याच गोष्टी परत येतायेत आणि ते सुद्धा त्याच पात्रांच्या तोंडी. लैला आणि इम्रान हे दोघेही स्वच्छंदी. त्यांच्यात एकवाक्यता येणारच.

मुळात आयुष्यात अर्जुन,कबीर,इम्रान, लैला आणि नताशा एवढीच पात्र नसतात. ह्याशिवायही कितीतरी पात्र असतात. आपल्या वागण्यावर त्यांची रिऍक्शन काय हे सुद्धा पाहायला हवे.

जाता जाता..जिंदगी ना मिलेगी दोबारा हा माझाही अत्यंत आवडता सिनेमा आहे..