'विडंबित' अंगाई गीत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
11 Dec 2018 - 11:30 am

ब्लॉग दुवा https://www.apurvaoka.com/2018/12/blog-post.html

लहान मुलं झोपत नाहीत अशी तक्रार बहुतेक पालकांची असेल कदाचित. अशाच एका पालकाच्या तक्रारीवर चिंतन करताना गमतीत सुचलेलं एक काव्य.

सो गया ये जहाँ च्या चालीवर काही मराठी ओळी. यांनी चार दोन मुलं मुली वेळेवर झोपल्या तर त्यांच्या पालकांनी जरूर अभिप्राय कळवावा☺️

झोपली जंगले
झोपली श्वापदे
झोपले झाड ही
झोपली पाखरे
झोपली धरा अन अंबरे
घरे अन मंदिरे
झोपले चराचर

झोपल्या या नद्या
झोपले हे झरे
झोपल्या टेकड्या
पर्वतांचे कडे
झोपली उन्हे किरणे नभी
तिथे क्षितिजावरी
झोपला रवी तो

सो गया ये जहाँ चा मराठी अवतार.

कविताबालगीतविडंबन

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

12 Dec 2018 - 4:38 pm | पिलीयन रायडर

फार उपयोगी पडतंय सध्या हे!

वेल्लाभट's picture

14 Dec 2018 - 10:40 pm | वेल्लाभट