आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग २

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
21 Nov 2018 - 12:56 pm

अयुबोवेन रत्नद्वीप -प्रस्तावना

एकीकडे दिवाळी सुरु झाली आणि दुसरीकडे ऑफिसची कामे उरकण्याची धांदल चालूच होती.वेळ मिळेल तसे यादी करणे सामान भरणे औषधे वगैरे आणणे चालूच होते.तेव्हढ्यात श्रीलंकेत राजकीय भूकंप झाल्याची बातमी आली. विद्यमान सरकारला उलथून नवीन सरकारने सत्ता ब्लॅकवायचा प्रयत्न चालविला आहे असे पेपर मध्ये येऊ लागले आणि आम्ही जरा धास्तावलो. नेहमी शांत असणाऱ्या या देशात आत्ताच काय हे संकट उद्भवले आणि आमची ट्रिप रद्द तर होणार नाही ना अशी शन्का येऊ लागली. पण ट्रॅव्हल एजन्टने फोनवर भरवसा दिला कि तसे काही होणार नाही आणि या घडामोडींचा टुरिझमवर काही परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा.
बघता बघता जाण्याचा दिवस उद्यावर आला आणि अजून एक संकट उभे ठाकले.दिवाळीचे निमित्त साधून एयर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाला आणि आमची जाण्याची दोन्ही विमाने म्हणजे मुंबई चेन्नई आणि चेन्नई कोलंबो एयर इंडियाचीच होती.आता आली का पंचाईत ?

पण आमच्या सुदैवाने एकाच दिवसात काहीतरी तोडगा निघाला आणि सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याचे समजले. अशा एकेक हिंदोळ्यावर झुलता झुलता आणि अजून काही उलथापालथी होऊ देऊ नको अशी देवाकडे प्रार्थना करत आम्ही एकदाचे मुंबई विमानतळावर पोचलो.यथावकाश चेक इनच सोपस्कार पार पडले आणि सामानापासून सुटका झाल्याने मोकळ्या हाताने आम्ही आतमध्ये जाऊन विमानाच्या गेट जवळ जाऊन बसलो.
एयर इंडियाचे लुफ्तान्सा जेट वगैरे कंपन्यांचे मला एक आवडते कि त्यांचे अन्न बहुतेक वेळा चांगले आणि चवदार (म्हणजे आपल्या भारतीय पद्धतीचे ) असते त्यामुळे जास्त त्रास होत नाही. आणि इंडिगो गो स्पाईस आजकाल प्रत्येक पदार्थाचे वेगळे पैसे लावतात किंवा विकतात तसे एयर इंडिया अजून तरी करत नाही.पण बाकी सर्विस बद्दल न बोललेलेच बरे.
२ तासात आम्ही चेन्नई ला पोचलो आणि एक नवाच घोळ समोर आला. एकतर दोन्ही विमाने एयर इंडियाची असून आम्हाला आमचे सामान बेल्टवरून घ्यावे लागणार आणि पुन्हा दुसऱ्या विमानात चढवावे लागणार हे समजले. दुसरे म्हणजे चेन्नई चा डोमेस्टिक आणि इंटर नेशनल विमानतळ थोडे लांब आहेत आणि तेव्हढे अंतर चालत (सामानासकट) जावे लागणार होते. शिवाय कोलंबो आणि अंदमान वाल्यांना इमिग्रेशन ची झंझट होतीच. सुदैवाने आमचे पुढचे विमान ८ तासानंतर होते त्यामुळे हे सर्व सोपस्कार पार पडायला पुरेसा वेळ आमच्या हातात होता. पण ह्या सगळ्यात २-३ तास निघून गेले आणि त्रास झाला तो वेगळाच. पण करणार काय ?
शेवटी एकदा सगळे पार पडून इंटरनेशनल विमानतळावर पोचलो आणि बघतो तर तिकडे एयर इंडियाचे काउंटरच दिसेना .हि काय नवीन भानगड ? थोडी चौकशी केल्यावर समजले कि इथे बरेच काउंटर भाडे तत्वावर सर्व कंपन्या मिळून वापरतात तेव्हा तुमच्या विमानकंपनीचे लोक विमानाची वेळ झाली कि येतील आणि काउंटर चालू करतील. पुन्हा २-३ तास हरी हरी केल्यावर एकदाचे ते काउंटर उघडले आणि सामान चेक इन करून आम्ही दुसऱ्या विमानात बसलो.हा प्रवास फक्त सव्वा तासात झाला आणि सकाळी ८ च्या सुमारास आम्ही कोलंबो विमानतळावर उतरलो.
q

लगेज बेल्ट्वरुन सामान घेतले अनि विमानतळाबाह्रेर आलो. ट्रॅव्हल एजंटने ड्रायव्हरचे नाव आणि नंबर आधीच पाठविला होता, पण त्याची गरजच लागली नाही.टोयोटा के डी एच व्हॅन घेऊन आमचा सिंहली ड्रायव्हर उपुल हसतमुखाने आमच्या नावाचा बोर्ड घेऊन उभाच होता. आयुबोवेन श्रीलंका असे स्वागत करून त्याने आमचे सामान गाडीत ठेवेल आणि आमचा प्रवास सुरु झाला.

प्रतिक्रिया

साबु's picture

21 Nov 2018 - 1:44 pm | साबु

फोटो पण टाका...

अनन्त अवधुत's picture

22 Nov 2018 - 12:29 am | अनन्त अवधुत

पहिल्यांदा मला ड्रायव्हरचे नाव 'उपुल हसतमुखाने' असे वाटले. वाचतोय...

पुढच्या भागांची वाट पाहात आहे. पटापट लिहा.

यशोधरा's picture

22 Nov 2018 - 10:23 am | यशोधरा

वाचते आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Nov 2018 - 11:36 am | राजेंद्र मेहेंदळे

गूगल ड्राइव्हवरुन फोटो टाकायला (पब्लिक अ‍ॅक्सेस द्यायला) जमत नाहिये. काय करावे लागेल?

या भागातला फोटो दिसतोय का?

मुक्त विहारि's picture

22 Nov 2018 - 2:59 pm | मुक्त विहारि

मस्त...

स्व पैशाने प्रवास करायचा असेल तर, एयर इंडियाच्या विमानापेक्षा, चालत किंवा पोहत प्रवास करणे उत्तम..असे माझे मत...(फुकट मात्र परवडते...कारण, एयर इंडियाच्या कर्मचार्‍यांचा फीड-बॅक फॉर्म, कर्मचार्‍यांची स्तूती करून लिहिला तर, खाण्या-पिण्याच्या वस्तू योग्य प्रमाणात मिळतात.)

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Nov 2018 - 11:52 am | राजेंद्र मेहेंदळे

आवडेल एकदा पोहत जायला.