भात घ्या की !!

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in जनातलं, मनातलं
26 Sep 2018 - 10:48 pm

बऱ्याच दिवसांनी मी आणि आई माझ्या सासुरवाडीला आलो होतो, सासू आणि बायको काही कामासाठी 2 दिवस बाहेर गेल्या होत्या, घरी मी, माझी आई, माझा सासरा आणि सासऱ्याची आई असे 4 जण जेवायला बसलो होतो, मी नेहमीच खूप कमी जेवतो अशी माझ्या सासरकडच्यांची तक्रार असते.

आजही मी कमीच जेवत होतो, माझ्या ताटात वाढलेला भात आता संपायला आला होता, तर सासू आणि बायकोची कमी भरून काढण्यासाठी सासरे मला म्हणाले "अहो जावई बापू भात घ्या भात"
मी म्हटले नको बास झालंय मला,
सासरे म्हणाले अहो घ्या की
मी म्हटले अहो नको पॉट भरलंय गच्च.
सासरे नुसतेच हसले
म्हणाले "आव जावई बापू भात मला पायजेय, भात घ्या हिकडं" !!!!!

बोंबला तिच्यायला

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

26 Sep 2018 - 11:09 pm | जव्हेरगंज

=))

ज्योति अळवणी's picture

26 Sep 2018 - 11:14 pm | ज्योति अळवणी

झक्कास

अभ्या..'s picture

26 Sep 2018 - 11:17 pm | अभ्या..

वाहवा घ्या पाटलानु.

अथांग आकाश's picture

26 Sep 2018 - 11:47 pm | अथांग आकाश

हे हे हे!

.

जयन्त बा शिम्पि's picture

27 Sep 2018 - 3:42 am | जयन्त बा शिम्पि

ह ह पु वा

हाह्हाहाहा..
जब्री किस्सा..

श्वेता२४'s picture

27 Sep 2018 - 11:13 am | श्वेता२४

मी पण अशा प्रसंगांना सामोरी गेलेय. जरा भात घ्या असं म्हटलं तर पाहुणे म्हणाले नाही नकोय मला. घरातले सगळे हसायला लागले. मी म्हणलं तुम्हाला नाही विचारत मला हवा आहे भात. तेव्हापासून बोलण्यात सुधारणा केली भाताचं (पातेलेयडबा) घ्या. वरणाचं(आमटी/घमेले) घ्या. असं म्हटल्यावर शक्यतो गोंधळ होत नाही

संजय पाटिल's picture

27 Sep 2018 - 12:01 pm | संजय पाटिल

=))

सिरुसेरि's picture

27 Sep 2018 - 12:11 pm | सिरुसेरि

हा हा हा ... वाचुन मजा आली .

तुषार काळभोर's picture

27 Sep 2018 - 12:20 pm | तुषार काळभोर

बायको नव्हती, नायतर कुटला असता!

कानडाऊ योगेशु's picture

27 Sep 2018 - 12:37 pm | कानडाऊ योगेशु

मजेदार किस्सा.
मागे दुपारी झोपण्याला "जरा पडा आता" यावरुन घडलेल्या किस्श्या संदर्भात ही मिपावरील एक लेख वाचनात आला होता त्याची आठवण झाली.

सतिश पाटील's picture

27 Sep 2018 - 3:35 pm | सतिश पाटील

निदान सासू सासऱ्यांसमोर तरी वेंधळेपणा होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो, शेवटी व्हायचं तेच होतं.

याच विषयावर लग्नाशी संबंधीत एक लेख लिहितोय.
झाल्यावर टाकतो.

टर्मीनेटर's picture

27 Sep 2018 - 3:47 pm | टर्मीनेटर

गमतीशीर :)

हलका फुलका विनोदी प्रसंग !!!!

जयन्त बा शिम्पि's picture

28 Sep 2018 - 6:58 am | जयन्त बा शिम्पि

सुप्रसिध्द कथाकथनकार शंकर पाटील यांच्या " मिटिंग " या ग्रामपंचायतीच्या सभेवर आधारीत कथेतसुध्दा
रात्री दहा वाजता,सरपंच जेंव्हा,शिपायास, कमिटी 'मेंबरांना' बोलावण्याची सूचना करतात्,त्यावेळी इरसाल शिपाई, " आ SS ता , जवळ SS जवळ S झोपायची येळ झाली आहे, तवा कोणी ईल असं वाटत नाही " असे सूचक बोलतो. मग काय ? हास्याचा गडगडाट ! ! !

असेच माझे ग्रामीण भागातील मित्राला मी जेवायला घरी बोलावले होते. डायनिंग टेबलवर मोठ्य थाटामाटात मी त्यांची जेवणाची सोय केली होती. माझ्या बायकोने जस जसे पदार्थांचे बाऊलस आणून त्यांच्या समोर ठेवण्यास सुरवात केली तसतसे ते दरखेपेला म्हणायचे"आहो! मी ऐवढे काय खातोय हो"माझी पण चांगलीच पंचाईत झाली. आपण आता या बाऊल मधील पदार्थ घ्यायचे की नाही.

एमी's picture

5 Oct 2018 - 4:44 pm | एमी

:D :D
भात द्या इकडे किंवा भाताचे पातेले द्या इकडे का नाहीत म्हणत?